१९९९ मध्ये दहशतवाद्यांच्या रुपात पाकिस्तानी जवान कारगिल, द्रास सेक्टरमध्ये घुसले. ऑपरेशन विजय सुरू करण्यात आले. भारतीय जवानांना अशी ट्रेनिंग नव्हती की जे डोंगर किंवा उंच ठिकाणावरुन लढू शकतील.पाकिस्तानचं सैन्य उंच भागावर होते. भारताला याची माहिती नव्हती की नेमकं पाकिस्तानचं सैन्य कुठे आहे. त्यानंतर भारताने इस्राईलची मदत मागितली होती.इस्राईलकडे मदत मागताच इस्राईलने कारगिल सेक्टरमध्ये घुसखोरी विरोधात रणनिती बनवायला सुरुवात केली.बॉर्डरवर कंट्रोल, काउंटर टेरेरिज्म आणि लिमिटेड वॉरमध्ये त्यांच्या सारखं जगात कोणीच नाही.हेरोन आणि सर्चर सारखे ड्रोन जे उंचावरुन निरीक्षण करतात आणि शत्रू कोठे आहे याबद्दल माहिती देतात ते भारताला पुरवले गेले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews